आंबेडकरी चळवळ
आंबेडकरी चळवळीचे मारेकरी आज वेगवेगळे चेहरे घेऊन समाजकारणात आणि राजकारणात वावरताना दिसतात.नुकतीच होऊ घातलेली शिवशक्ती भीमशक्ती युती च्या संबंधाने पुण्यनगरी या दैनिकात भाऊ तोरसेकर हे पत्रकार गेल्या अनेक दिवसापासून या युतीच्या संबंधाने सकारात्मक लिखाण करीत आहे.परंतु या लिखाणातून तोरसेकर आंबेडकरी समाजाचा बुद्धिभ्रम करीत आहे.तोरसेकरांनी कोन्ग्रेस पासून दलितांनी सावध असावे या बाबत केलेले विवेचन सामाझ्न्या सारखे आहे मात्र त्याचवेळी त्यांनी याही प्रश्नाचे उत्तर दिले असते तर बरे झाले असते कि, सेनेसोबत जाऊन दलित समाजाचा आंबेडकरी स्वाभिमानी बना कसा टिकणार आहे? रामदास आठवलेंचे राजकारण सर्वाना माहित आहे. ते जरी आंबेडकरी चळवळीचे एखाद्या गटाचे नेते असले तरी ते आंबेडकरी समूहाचे प्रतिनिधी होऊ शकत नाही. घरी नाही पीठ आणि मागायला चालले विद्यापीठ या किंवा आंबेडकर निजामाचे हस्तक होते या विषारी शब्दास्त्र बाबत अजूनही ठाकरेंनी आंबेडकरी समाजाची माफी मागितलेली नाही.
Post a Comment